फलटण प्रांताधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी आपल्या निषेध भावना व्यक्त करतानाच बँड वाजवून महेश मांजरेकर यांचा निषेध नोंदविला
सिने दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर यांनी बॅन्ड कलाकारांना जाणीवपूर्वक हातचाळे करून अपमानास्पद वागणूक काळे धंदे या मालिकेत दिल्याने बँड वादकांचा अपमान केला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयचे निवेदन फलटणचे प्रांतअधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना फलटण येथे अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, महेश वामन मांजरेकर यांनी झी 5 या वाहिनीवर 'काळे धंदे' या वेबसिरीजद्वारे बँड (वाद्य) कलाकार कामगारांना जाहीरपणे अश्लील, गलिच्छ, तिरस्कारयुक्त संभाषण केल्याचा व कृतीतून घडवून आणलेल्या चित्रवाहिनीमधून अपमानास्पद प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला. यावर योग्य कारवाई करण्यात यावी त्यांचबरोबर या मालिकेचे निर्माता दिग्दर्शक यांच्यावर कारवाई करीत बँड कलाकारांची जाहीर माफी मगावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र राज्य घडसी समाज संघाचे अध्यक्ष अनिल शंकरराव पवार, संस्थापक जेष्ठनेते अनिल गणपत वनारे, बाजिराव दत्तोबा पवार, दिलिप बिरलिंगे, अनिल धुमाळ, पंढरपूर, धुळदेवचे ग्रामपंचायत सदस्य कैलास बाबुराव पवार , ओंकार हरिदास साळुंखे, ओंकार यशवंत पवार,अक्षय हरिदास साळुंखे, अमित सोमनाथ वाडेकर, योगेश धुमाळ, चेतन भोसले, मानव भोसले, अनिकेत मोरे, संतोष गणेश पवार, अमोल भोसले,अशोक तुळशीदास साळुंखे, ईश्वर नितिन पवार, प्रेम भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी फलटण प्रांताधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी आपल्या निषेध भावना व्यक्त करतानाच बँड वाजवून महेश मांजरेकर यांचा निषेध नोंदविला.