फलटण प्रतिनिधी :
फलटण येथील तहसील कार्यालयातील भ्रष्ट व लाचखोर कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी सातारा या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात एका निवेदनाद्वारे फलटण उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी स्वीकारले.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, आपल्या तहसील कार्यालया मधील कर्मचारी हे सर्व सामान्य नागरीकांन कडून विविध कामासाठी दिलेल्या शुल्का पेक्षा आतिरिक्त (पैसा) लाच मागत घेत असुन अशा भ्रष्ट कर्मचारी लाचखोर कर्मचारी, शासनाची फसवणूक करणारे कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून तहसील कार्यालय भष्टाचार मुक्त करावे. दहा दिवसामध्ये कारवाई न झाल्यास जिल्हाअधिकारी सातारा यांच्या दालना समोर 26/ 7/ 2024 रोजी अमरण उपोषण केले जाईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर सुनिल पवार, अजित मोरे, शंकर पवार, विशाल सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत.