फलटण प्रतिनिधी -
श्वास बहुउद्देशीय विकास संस्था,फलटणच्या वतीने दि.१३ जून रोजी रोजी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन या ठिकाणी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सामाजिक त्यांचबरोबर विध्यार्थी मार्गदर्शन, करियर मार्गदर्शक अशा विविध क्षेत्रात संस्था कार्यरत राहणार आहे.
श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या शुभारंभा निमित्त विद्यार्थ्यांना करियर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.प्राचार्य शिवाजी सावंत होते. तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉ.बाळासाहेब कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉ. प्रभाकर पवार, प्राचार्य सुधीर अहिवळे, प्राध्यापक प्राचार्य वर्धमान अहिवळे, माजी प्राचार्य विकास काकडे, सौ. अंजली अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीन समाजातील विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन त्याच बरोबर व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थेला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी मंगेश सावंत, कपिल काकडे, मुकेश अहिवळे, चंद्रकांत मोहिते, शुभम अहिवळे, मोहन ढावरे, दयानंद पडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.