विठ्ठलभक्त वारकर्यांना वेध लागले होते ते उभ्या रिंगणाचे.संपुर्ण पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण,रिंगणाच्या उत्सुकतेने वारकर्यांची पाऊले भराभर चांदोबाच्या लिंबाकडे पडत होती सोहळा पुढे पुढे सरकत होता.रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या स्थानिक नागरिंकामधून आनंद व्यक्त केला जात होता.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील अडीज दिवसांच्या मुकक्कामानंतर हरिनामाच्या गजरात आज दुपारी पुढील प्रवासास मार्गस्थ झाला. माऊलीचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला.फलटणच्या कापडगाव येथील सरहद्दीवर फलटण तालुक्याच्या वतीने आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सह प्रमुख मान्यवरांनी स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सार्या विठ्ठलभक्त वारकर्यांना वेध लागले होते ते उभ्या रिंगणाचे.संपुर्ण पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगणाच्या उत्सुकतेने वारकर्यांची पाऊले भराभर चांदोबाच्या लिंबाकडे पडत होती. सोहळा पुढे पुढे सरकत होता.रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या स्थानिक नागरिंकामधून आनंद व्यक्त केला जात होता.रस्त्याकडील बाजूला असणार्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूड रंगली होती. चांदोबा लिंब ठिकाणी पंचक्रोशीतील भाविंकांनी पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान माऊलीचां रथ चांदोबाचा लिंब येथे आला, गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यंानी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सुचना न देता वारकर्यांच्या गर्दीतुन हजारो लाखो वारकरी दुतर्फा झाले व अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. रिंगण लावल्यानतंर रथापुढील 27 दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजार्यांनी दौडत आणला.ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यापर्यत्र नेल्यानंतर माघारी पळत आला.माऊलींच्या रथा जवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुुखानंी अश्वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्याचा नैवद्य दाखविला त्यानंतर अश्वाने दौड घेतली.पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीच अश्व अशी दौड पुर्ण झाली.अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आर्शीर्वाद असलेल्या भाविकांनी अश्व ज्या ठिकाणाहुन गेला आहे, त्याच्या पायाखालीची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.अशा तर्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले.
यावेळी परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला- पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेराने येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू झाला होता. रिंगणाच्या जागेत काढलेल्या समर्थ रंगावलीच्या सुंदर रांगोळ्या आणि तितक्याच अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी रिंगण संपल्यावर तरडगावच्या मुक्कामासाठी सरसावले.