फलटण प्रतिनिधी:-मोजे सोमंथळी येथील वीटभट्टीवरील खोली मधून वीटभट्टी मालक यांच्या समतीशिवाय ठेवलेली 80 हजार रुपये चोरून नेहल्याप्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 19 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान मोजे सोमंथळी येथील पाटील वस्तीवर फिर्यादी सुहास दत्तात्रय सोडमिसे यांच्या मालकीच्या वीटभट्टीवरील खोली मधून आनंद विष्णू शिंदे (राहणार खासापुरी नंबर एक तालुका पराडा जिल्हा उस्मानाबाद) याने फिर्यादी वीटभट्टी मालक यांच्या समतीशिवाय वीटभट्टीवरील खोलीत ठेवलेली 80 हजार रुपये मुद्दाम लबाडीने चोरून नेली. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोहवा अडसूळ करीत आहेत.