फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यामध्ये श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली पालखी बाबतच्या विविध योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत ची मागणी डराडो या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे करण्यात आली आहे.
डसऱ्याक असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या आहेत की, गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा फलटण मार्गे पंढरपूरला जातो. परंतु प्रत्येक वेळी नियोजनांमध्ये अनेक त्रुटी राहून जातात. त्यामुळे यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यातील सर्व भाविकांचे तसेच फलटण मधील नागरिकांचे योग्य पद्धतीने आरोग्याचे व स्वच्छतेचे नियोजन करण्यात यावे, तसेच फलटण तालुक्यातील पालखी मार्गावरील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे त्याबाबत तत्काळ उपयोजना कराव्यात व तत्काळ खड्डे बुजवण्यात यावे.
फलटण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजाताई खरात या अनेक महिन्यांपासून मागणी करीत आहेत की, फलटणमध्ये अनेक सुलभ शौचालये निर्माण करण्यात यावीत, परंतु फलटणमध्ये चालू असलेल्या मुताऱ्या पाडण्यात आलेल्या आहेत. त्या तात्काळ उभारण्यात याव्यात, तसेच चालती फिरती सुलभ सौचालये जागोजागी उभी करण्यात यावीत जेणेकरून इतरत्र घाण होणार नाही. फलटणमध्ये पालखी आगमन वेळी व फलटण मधून पालखी प्रस्थानानंतर पाणीपुरवठा होतो त्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण थोडे वाढविण्यात यावे, जेणेकरून अनेक आजारांचे निर्मूलन करणे अगदीच सोपे होईल. तसेच डीडीटी पावडर फवारण्यात यावी. पालखीसोबत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या तपासण्या व उपचार करण्यासाठी अनेक पथकांची निर्मिती करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात यावेत. निवेदनात नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून फलटणकर व येणाऱ्या सर्व भाविकांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहील अशा स्वरूपाची मागणी या निवेदनाद्वारे, डसऱ्याक असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेच्या डायरेक्टर डॉक्टर महेशकुमार धोंडीराम खरात व ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचेकडे केली आहे.