Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नाही : मा. खा. रणजितसिंह ना. निंबाळकर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :

बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु फलटणची खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. सासवड ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन मा. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व जेष्ठ नेते मा प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडले यावेळी झालेल्या कार्यक्रमात रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते . यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, धनंजय साळुंखे पाटील,संत कृपा डेअरी चे प्रमुख विलासराव नलवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर,शहराध्यक्ष अमोल सस्ते,माजी नगरसेवक व शहरप्रमुख अनुप शहा ,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जयवंत केंजळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे,मा.लतीफभाई तांबोळी, श्री शंभूराजे बोबडे, यांच्यासह हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना मा. खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की , बारामतीचे पाणी फलटण ला आणल्या मुळेच माझी खासदारकी गेली पण फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे सांगितले. 30 वर्षात मा रामराजेंनी फलटण चे पाणी बारामतीला विकले, लाल दिव्यासाठी फलटणच्या जनतेला बारामतीत गहाण ठेवले त्यांनी मा देवेंद्र फडणवीस व खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये असे स्पष्ट केले. ज्या आमदाराला मतदारसंघाला निधी किती आला हे माहित नसणे हे तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल आणि असल्या नंदी बैलांला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे आणि येत्या विधानसभेत फलटण ची सुज्ञ जनता ते काम चोख करेल यात शंका वाटत नाही.

माजी नगरसेवक अनुप शाह यांनी कॉन्टॅक्ट च्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार, विकास सोसायटी मधून शेतकऱ्यांना सभासद होण्यासाठी दिला जाणारा त्रास,पाण्याच्या कोटींच्या वर खर्च केलेल्या योजना तरीही गावात राज्यातील पहिला पाण्याचा टँकर सासवड मध्ये, ग्रामपंचायत मध्ये घोटाळे, डोंबाळवाडी योजना घोटाळा असा भ्रष्टाचाराचा पाढाच समोर ठेऊन यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवलाच पाहिजे असे मत व्यक्त केले.

जेष्ठ नेते प्रल्हाद तात्या पाटील यांनी श्री रामराजे यांनी लोकसभेला युती धर्म पाळला नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपा देखील त्यांना निवडणुकीत हरवण्यासाठीच काम करेल असे ठासून सांगितले. जे पक्षाचे झाले नाहीत ते युतीचे काय होतील ? असा सवाल करुन केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे पण ज्या कामात काहीही हातभार नसताना आयत्या पिठावर रेघोट्या रामराजेंनी ओढू नये अशा स्पष्ट भाषेत प्रल्हादराव पाटील यांनी समाचार घेतला.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष धनंजय पवार व किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जयवंत केंजळे यांच्या मार्गदर्शनात अमोल चंद्रकांत झणझणे यांची किसान मोर्चा फलटण तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.

आखिल भारतीय संत नामदेव महाराज संस्थेच्या वतीने संत नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे ची जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सहकारी यांनी त्यांचा जाहीर सत्कार करून पूर्ण शिंपी समाज व संत नामदेव भक्तांच्या वतीने आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र काकडे यांनी केले व आभार किरण जाधव यांनी मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER