फलटण प्रतिनिधी - फलटण येथील एका महिलेचा स्पंदन हॉस्पिटल येथील डॉ. रसाळ यांच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाला असून त्या स्पंदन हॉस्पिटल व डॉ. रसाळ यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती आझाद सामाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सनी काकडे यांनी दिली.
निवेदनात असे म्हटले आहे की, रत्नमाला संपत रिटे यांना दिनांक ९/१०/२०२३ रोजी दुपारी डॉ. रसाळ यांच्या स्पंदन हॉस्पिटल मध्ये अँडमीट करण्यात आले होते.त्या दिवसभरात १८ ते २० हजार रूपये किमतीचा गोळ्या औषधे यावर खर्च झाला. मात्र डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रत्नमाला रिटे यांचा दुर्दैवी मुत्यु झाला आहे. रिटे यांच्या मृत्यू नंतरही त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण बिलाची मागणी करीत रिटेयांचे शव देण्यास डॉ. रसाळ यांनी मनाई केले असून त्यामुळे मयताची विटंबना झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गरीब पेशंटला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यानंतर वेगळ्या पद्धतीने बघणार असून इतर हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स पेमेंट शिवाय घेतले जात नसल्याचे डॉ. रसाळ यांनी म्हटल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला असून डॉ. रसाळ व स्पंदन हॉस्पिटलवर असून कारवाई न झालेस आझाद समाज पार्टी व कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने प्रांतकार्यालया बाहेर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदनदेते वेळी मंगेश आवळे, महादेव गायकवाड, सुरज भैलुमे आदी उपस्थित होते.