फलटण प्रतिनिधी :- फलटण येथील सेंट्रींग व्यवसायिक नितिन दशरथ कापसे( वय ४३) रा. झिरपवाङी यांचे १५ हजार रुपये गोल्ङन बेकरी जवळ पङले होते . ते येथील प्रसिद्ध फोटोग्राफर रुत्विक शिरिष माळवे यांना सापङले . त्याने कुणाचे पैसे पङले का ? म्हणून आसपास विचारपूस केली असता , लगेचच गोल्ङन बेकरी चे सीसीटिव्ही फुटेज तपासून कुणाचे पैसे पङलेत ती फुटेज प्रसारित केली असता तीन चार जणांनी नितिन कापसे यांना फोन करुन तुमची पैसे पङल्याची फुटेज दिसत असल्याचे सांगितले . तात्काळ त्यांनी संपर्क करताच फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज शिंदे आणि दैनिक लोकमत चे तालुका प्रमुख आणि नगरसेवक अजय माळवे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये १५ हजार रुपये नितिन कापसे यांना परत देण्यात आले. रुत्विक माळवे यांच्या प्रामाणिक पणा बद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.