फलटण - गायरान जमिनी धारकांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 20 जुलै रोजी पावसाळी अधिवेशना दरम्यान महामोर्चाचे आयोजन केले असून गायरान जमीन धारकांच्या हक्कासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने मोर्चा यशस्वी करून गायरान जमीन धारकांचा लढा यशस्वी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा राजकीय निरीक्षक इम्तियाज नदाफ यांनी केले.ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासकीय विश्रामगृह फलटण येथे पक्षाची बैठक पार पडली यावेळी बोलत होते.
यावेळी पक्षाचे सातारा जिल्हा महासचिव नगरसेवक तुषार बैले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जावळे, जेष्ठ नेते सुभाष गायकवाड,माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, कन्हैय्या रीटे, सतीश कांबळे, राजाभाऊ घोरपडे, गोरखनाथ मुळीक, शरद घोरपडे, चंद्रकांत गायकवाड, बी.डी. घोरपडे, दीनकरराव जगताप, अमीत गायकवाड, विजय काकडे, विजय कांबळे, सुखदेव शिंदे, सुर्यकांत कांबळे, गौतम मोहिते, दत्तात्रेय आवाडे, फलटण शहर अध्यक्ष उमेश कांबळे, रोहित अहीवळे, शैलेश हनुमंत बिबवे, महीला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष चित्राताई गायकवाड, फलटण शहर अध्यक्षा सौ. सपनाताई भोसले, शारदा हनुमंत बीबवे, व इतर मान्यवर उपस्थित होते.



















