Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना मार्गी लावणार : ना. गजेंद्रसिंह शेखावत

नीरा - देवघरचे अपूर्ण काम ही लवकरच पूर्ण होणार : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
टीम : धैर्य टाईम्स

फलटण दि. १३ 

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरु असून या वादात तेलंगणा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, तथापि हा प्रश्न निकाली निघेल यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असून त्यानंतर कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना मार्गी लावून या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्याची ग्वाही केंद्रीय जल संपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.

आज (सोमवार) रोजी पंढरपूर येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ना. शेखावत बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शहाजी बापू पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान औताडे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सास्ते, राहुल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेण्यातील अडचण दूर करणार

  कृष्णा पाणी लवादाच्या निर्णयानुसार एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळविता येत नसल्याने कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना पूर्णत्वास नेण्यात असलेल्या अडचणी दूर करुन उपलब्ध पाणी वाटपाची फेररचना ब्रिजेशकुमार आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यासाठी आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरणार असल्याचे ना. शेखावत यांनी स्पष्ट केले.

९५ कायम दुष्काळी तालुक्यांपैकी ५५ तालुके प. महाराष्ट्रात

 राज्यातील ९५ कायम दुष्काळी तालुक्यांपैकी ५५ तालुके पश्चिम महाराष्ट्रात येतात. त्यांना कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना पूर्ण करुन कृष्णेचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करताना आपण राजस्थान सारख्या तीव्र पाणी टंचाईच्या प्रदेशातून येत असल्याने पाणी टंचाईची जाण आपल्याला असल्याने कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजने बाबत आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. शेखावत यांनी केले.

राज्य सरकारची वेळ काढू पणाची भूमिका

 नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्प राज्याच्या अखत्यारीत असल्याने केंद्रीय जलसंपदा मंत्री या नात्याने आपण २ वेळा पत्रव्यवहार करुन या प्रकल्पाच्या पूर्ततेबाबत असलेल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याबाबत योग्य सहकार्याची केंद्राची भूमिका होती, तथापि हायड्रॉलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांना पाणी बारामती व अन्यत्र वळवायचे असल्याने कदाचित त्यांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतली, अन्यथा हा प्रकल्प पूर्वीच पूर्ण झाला असता असे मत ना. शेखावत यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्रात आता सकारात्मक निर्णय होतील

 आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आपण दिल्लीत बैठक घेऊन कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना आणि नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी लवकरच योग्य मार्ग काढून येथील कायम दुष्काळी पट्ट्यातील पाण्याचा प्रश्न निश्चितपणे लवकरच मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन ना. शेखावत यांनी केले.

दोन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करणार

देशामधील दुष्काळी भागासाठी ठोस उपायोजना करण्याचे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याने महाराष्ट्रातील नीरा - देवधर आणि कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण या दोन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे तातडीने सुरु होतील असे आश्वासन केंद्रीय जल संपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांनी यावेळी दिले.

संपूर्ण कायम दुष्काळी पट्ट्यात कृष्णेचे पाणी पोहोचविणार

केंद्रीय जल संपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे आपण हायड्रॉलॉजिकल डेटा तपासणी, त्यासाठी हवाई पाहणी करण्याची मागणी केल्यानंतर आज त्यांनी स्वतः नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्पातील धारण, लाभ क्षेत्र, धरणापासून ६५ कि. मी. (वाघोशी) पर्यंत झालेल्या कालव्याच्या कामाची, आणि नीरा - भीमा स्थैर्यीकरण योजनेतील सोमंथळी, उद्धट, तावशी येथे नीरा नदीवर उभारलेले बंधारे व भूगर्भातून जाणाऱ्या कालव्यांची पाहणी केल्याचे पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून देत या दोन्ही योजनांबाबत ना. शेखावत सकारात्मक असल्याने आगामी काळात माढा, करमाळा तालुक्यासह संपूर्ण कायम दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी नक्की पोहोचणार असल्याची खात्री खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.पत्रकार परिषदेपूर्वी ना. शेखावत व मान्यवरांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे मंदिर समितीच्यावतीने त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

हेलीकॉफ्टर मध्ये नकाशावरुन दुष्काळी पट्ट्याची माहिती घेताना ना. शेखावत. (छाया : अमित साळुंखे, फलटण.)

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER