Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

भाजपा सरकार गरिबांची काळजी घेणारे सरकार : ना. अजयकुमार मिश्रा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या ८ वर्षांत सार्वजनिक विकासाचा ध्यास घेतला असून वैयक्तिक विकासाच्या शेकडो योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. भाजप सरकार गरिबांची काळजी घेणारे सरकार असून सर्वांगीण विकास केंद्रबिंदू मानून काम करणारे सरकार आहे. देशातील सर्व राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही विविध प्रकारच्या विकासकामांची चक्रे गतिमान होताना आज दिसत असल्याचे सांगत सर्वसामान्यांचा हिताचा विचार करून देशात काम करणारे मोदी सरकार हे देशातील पहिले सरकार असल्याचा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

ना. मिश्रा फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, या दरम्यान आयोजित लाभार्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकसभा प्रभारी व माजी मंत्री बाळा भेगडे, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार समाधान अवताडे, आमदार कल्याण शेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, शेखर लंभाते, शेखर वडने, धनंजय साळुंखे पाटील, अमर निंबाळकर, अशोक जाधव, सचिन अहिवळे, राजेंद्र काकडे, डॉ. गुळवे, डॉ. आगवणे, मनोज कांबळे, माऊली नाळे, सागर अभंग, प्रशांत कोरगावकर, महिला आघाडीच्या नंदिनी सावंत, शुभांगी रासकर, रुपाली कर्णे, मुक्ती शहा, सौ. इंगवले, रत्नमाला हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भागाचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्वाधिक केंद्राचा निधी उपलब्ध करून या भागात विविध विकासाची कामे कार्यान्वित केली असून रेल्वे, नीरा देवधर, विविध रस्ते, एमआयडीसी आदींची कामे मार्गी लावली असल्याने या भागातील नागरिकांनी खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन ना. मिश्रा यांनी केले.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर लाभार्थी मेळाव्यात म्हणाले, मोदी सरकार हे देशातील पाणी, रेल्वे, विविध रस्ते, घरकुल या योजनांसह अन्य विविध योजना सर्व सामान्यांना देणारे यशस्वी सरकार ठरले आहे. आगामी काही दिवसात फलटण मधील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना आपण निमंत्रित करणार असल्याचे सांगत नाईकबोमवाडी येथील नियोजित एमआयडीसीच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करणार आहे.

सध्या केंद्राच्या विविध योजना या भागात राबविल्या जात असून केंद्र अंतर्गत जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे. यापूर्वी रोजगार हमी-तुम्ही निम्मी-आम्ही निम्मी असा चालत असलेला कार्यक्रम यापुढे मोदी सरकारच्या काळात चालणार नाही. गोर-गरीब सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना सन्मान देणारे मोदींच्या नेतृत्वाखालील हे केंद्रातील पहिले सरकार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

दोन दिवसांच्या दौऱ्यात ना. मिश्रा यांनी या तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी दिल्या. यामध्ये कोळकी येथील शासन मान्य स्वस्त धान्य दुकानास भेट, शहरातील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन आरती केली, राष्ट्रीय खेळाडू कुमारी देविका घोरपडे यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. शासकीय विश्रामगृहात (इरिगेशन) आयोजित लोकसभा व विधानसभा कोअर कमिटी बैठक आणि संजय चिटणीस यांच्या निवासस्थानी आयोजित संघाच्या बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

दि. ६ रोजी सकाळी सुरवडी व निंभोरे येथे रस्त्यांच्या कामाची पाहणी, फलटण येथील श्री सद्गुरू हरिबुवा मंदिरात जाऊन दर्शन, मलठण येथील वारकरी भवनच्या विस्तृत इमारतीचे भूमिपूजन, येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहून केंद्रातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थींच्या मेळाव्यानंतर मंगळावर पेठेतील भीमस्फूर्ती स्मारकास भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन दौऱ्याचा समारोप करून ना. मिश्रा दिल्लीकडे रवाना झाले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER