Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार

लाचार नेता तालुक्याला मिळाला : खा. रणजितसिंह यांचा घणाघात

टीम : धैर्य टाईम्स

हायड्रॉलीक रिपोर्ट बदलून पाणी बारामतीला पळविल्याचा रिपोर्ट सी. डब्लू सी ने दिलेला असून सी. डब्लू सी ने दिलेला निर्णय मोठा की बारामती असा सवाल करीत फलटण तालुक्याचे पाणी मंत्रीपदासाठी विकणारा लाचार नेता फलटणला मिळाल्याचा घणाघात आ. रामराजे यांचे नावं न घेता खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. ते फलटण तालुका संपर्क दौऱ्यात तरडगाव येथे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर धनंजय साळुंखे पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, अरुण शेलार, स्वराज पतसंस्थेस चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, अनुप शहा, अतुल गायकवाड, वसीम मणेर, महिला आघाडीच्या पदाधिकारी,फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, बबलू मोमीन मा. नगरसेवक जाकीरभाई मणेर, अनिल ढमाळ, वसंतराव ठोंबरे, यांच्या सह विविध खात्याचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

लवकरच रेल्वेची टेंडर निघतील असे सांगून रेल्वे चालत नाही असे लोकांना भासवण्याचे काम सध्या विरोधक करीत आहेत. यांची जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही असे सांगून गद्दारामध्ये यांच नावं घेतलं जाईल असे गंभीर वकत्तव्य खा. रणजितसिंह यांनी केले.

स्वतःच्या जमिनी सोडवून घेण्यासाठी यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात कामे केली मात्र तुम्हांला शरद पवारांचा फोटो लावायला लाज वाटतेय. फलटण तालुका तुम्हाला जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे सांगून निवडणूकीला माझ्या समोर या आणि तुम्ही नाही आलात तर बारामतीकरांना आणा असे आव्हान यावेळी खा. रणजितसिंह यांनी आ.रामराजे यांना दिले.

आपण आपल्या कार्यकाळात फलटणसाठी जे शक्य आहे ते करणार असून आपण मात्र अजित दादांशी सेवा केली, अजित दादांनी बारामतीला विकासाचं  मॉडेल तयार केले आहे पण तुमची लायकी अजित दादांनी भाषणात काढली होती असे या वेळी खासदारांनी निदर्शनास आणून दिले.

निरा - देवघर चे आपल्या वाट्याचे पाणी बारामतीला दिले होते ते आपण खासदार झाल्यानंतर पुन्हा तालुक्यातील जनतेसाठी आणले. तर फलटणकर शरद पवारचे बूट पुसायला पुढे आहेत मात्र मी जनतेची कामे करूनही मला आपण खलनायक उपादी देताय असे खा. रणजितसिंह म्हणाले.

निरा - देवघरचे काम हे रामराजेंचे एका दिवसाचं होते मात्र त्यानी जनतेला पाण्यासाठी झुलवत ठेवलं व बारामतीची चाकरी केल्याचा खा. रणजितसिंह यांनी आरोप केला.

तरडगाव मध्ये कावीळ मधून 200 ते 250 जणांना बाधा झाली होती. जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने अशुद्ध पाण्यामुळे आजार पसरल्याचे यावेळी तरडगाव येथील नागरिकांनी लक्षात आणून दिले. यावेळी मे महिन्या पर्यंत प्राधिकरण योजना पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

5 वर्षापर्यंत सदर योजना पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे खासदार रणजितसिंह यांनी आदेश दिले अन्यथा अधिकाऱ्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा यावेळी दिला.

तालुक्यातील विकासासाठी सत्तेचा लोलक हलता ठेवा असे सांगून बारामती चे पळविलेले पाणी पुन्हा खासदार रणजित दादांनी तालुक्यासाठी आणले आहे आपण सभापती म्हणून काय केले? असा सवाल अनुप शहा यांनी उपस्थित केला.

फलटणची रेल्वे कै. हिंदुराव ना. निंबाळकर यांनी आणली मात्र रेल्वे मंजूर झाली तेव्हा जाफर शरीफ नव्हे तर रामविलास पासवान हे रेल्वे मंत्री होते हे सांगून रामराजेच्या चिट्ठीनी कोणाला नोकरीं मिळाली? तर स्वतःची मुलगी व मुलगा यांना असा टोला यावी अनुप शहा यांनी लागवला.

खा. रणजितसिंह यांनी दुसरी एम आय डी सी फलटणला आणली मात्र खासदारांबद्दल संभ्रम निर्माण करणे एव्हडंच काम विरोधकांचे असून दादांनी सकारात्मक काम केले आहे ते काम जनते पर्यंत पोहोचवने आपले काम आहे येणाऱ्या निवडणुकीत आपली भूमिका महत्वाची असल्याचे यावेळी शहा यांनी निदर्शनात आणून दिले.

आजपर्यंत चे फलटण तालुक्यातील राजकारण फक्त पाण्यावर झाले आले. तरडगाव गावात सर्वात जास्त निरा - देवघरच्या पाण्याचा लाभ होणार असल्याचे जयकुमार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. राज्याच्या सरकारमधून तालुक्यातील दुष्काळ संपवण्याचीसाठी निरा - देवघर चा प्रश्न सोडवीला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील राजकारण थांबवा व विकासाच्या मागे उभा रहा असे आवाहन यावेळी जयकुमार शिंदे यांनी केले.

यावेळी तरडगाव, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, चांभारवाडी, कुसूर, आदी भागातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER