Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

निरा - देवघर प्रकल्पातील बचतीचे 3 टी. एम. सी. पाणी फलटण तालुक्याला मिळावे - आ. श्रीमंत रामराजे यांची विधान परिषदेत मागणी

टीम : धैर्य टाईम्स

नीरा-देवघर प्रकल्पाचे कि. मी. ६६ ते १३० पर्यंत कालव्याऐवजी पाइपलाइनने पाणी देण्याचा निर्णय झाल्याने पाण्याची सुमारे ४ टीएमसी इतकी बचत अपेक्षित असून त्यापैकी ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडी धरणात टाकण्यात येणार असून उर्वरित ३ टीएमसी पाणी लाभक्षेत्राबाहेर न देता लाभक्षेत्रात प्राधान्याने देण्यात यावे : आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर 

फलटण प्रतिनिधी : नीरा-देवघर प्रकल्पातून बचत होत असलेले ३ टी. एम.सी. पाणी फलटण तालुक्याला मिळावे अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे शासनाकडे करत त्याबाबत शासनाने काय निर्णय घेतला अशी विचारणा त्यांनी केली असता सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्याची ग्वाही ना. फडणवीस यांनी सभागृहात दिली.

नीरा-देवघर प्रकल्पाचे कि. मी. ६६ ते १३० पर्यंत कालव्याऐवजी पाइपलाइनने पाणी देण्याचा निर्णय झाल्याने पाण्याची सुमारे ४ टीएमसी इतकी बचत अपेक्षित असून त्यापैकी ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडी धरणात टाकण्यात येणार असून उर्वरित ३ टीएमसी पाणी लाभक्षेत्राबाहेर न देता लाभक्षेत्रात प्राधान्याने देण्याची मागणी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

नीरा-देवघर पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन फलटण व खंडाळा तालुक्यात करण्यात आले असून तसेच आतापर्यंत या प्रकल्पाचे पाणी वीर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे या तालुक्यात देण्यात आले असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे अनेक ठिकाणी वीर आणि नीरा-देवघरचे लाभक्षेत्र एकच असल्याने उसाचे वाढते क्षेत्र आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने पाणी देणे आवश्यक असल्याने बचतीचे पाणी या भागात प्राधान्याने दिले पाहिजे अशी आपली आग्रही मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर, सांगोला वगैरे भागाला हे बचतीचे पाणी देण्याची मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी केली असली तरी लाभक्षेत्रातील गरज ओळखून हे पाणी फलटण, खंडाळा, माळशिरस तालुक्यांना मिळाले पाहिजे अशी आपली मागणी असून त्याबाबत शासन काय निर्णय घेणार आहे, अशी विचारणा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील १३ गावे वंचित राहिली आहेत त्यांचा लाभक्षेत्रात समावेश करुन त्यांना बचतीतून पाणी मिळावे अशी मागणी केली.

आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाण्याचा हा विषय क्लिष्ट झाला असल्याचे सांगत निरा देवधरच्या लिफ्टचे पाणी सेव्ह होणार आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून किती बोलता येईल? आम्हाला बोलण्याची संधी द्या. निरा खोऱ्याचं एकत्रीत चित्र जे रंगवलं आहे त्याच्यावरही माझ्याकडे सोल्यूशन आहे. मात्र ते मला रेकॉर्डवर आणायचं नाही. पश्चिमेकडे निऱ्याच्या खोऱ्यात जाणारे पाणी आपल्याकडे सहज वळवता येईल. तसा प्रस्ताव कृष्णा महामंडळाकडे आहे तो मागवून घ्यावा आणि संयुक्त बैठक घ्यावी ही माझी मागणी आहे असे सांगितले.

यावेळी उपस्थित लक्षवेधीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ टीएमसी पाण्याची बचत होणार असून त्यापैकी ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडी प्रकल्पात टाकून हा प्रकल्प आठमाही करण्याचा निर्णय झाला असून उर्वरित ३ टीएमसी पाणी पंढरपूर, सांगोला तालुक्यांना देण्याची मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली असून कॅबिनेटमध्ये त्याबाबत तत्वतः निर्णय झाला आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आ. रामराजे यांनी जो काही विषय मांडला त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन. विषय समजून घेईन, अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या जातील ज्येष्ठ सदस्य व या प्रकल्पांची माहिती असणारे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्याची ग्वाही ना. फडणवीस यांनी सभागृहात दिली. आ. मोहिते-पाटील यांच्या मागणीप्रमाणे लाभक्षेत्राचा विस्तार करुन सदर १३ गावांबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन ना. फडणवीस यांनी यावेळी दिले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER