सचिन मोरे
माजी खासदार लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांची तिसरी पिढी म्हणजे त्यांचे नातू रणवीर नाईक - निंबाळकर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. अतिशय कमी वयात रणवीर नाईक - निंबाळकर हे त्यांचे चुलते व भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कोपरा सभासह मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी व्यस्त दिसत आहेत. रणवीर नाईक - निंबाळकर यांनी प्रचारात घेतलेल्या सक्रिय सहभागाने तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
रणवीर नाईक - निंबाळकर यांच्यावर प्रचाराची नवीन जबाबदारी देण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. रणवीर नाईक - निंबाळकर यांच्या प्रचाराने फलटणच्या राजकारणात ट्विस्ट येणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. रणवीर नाईक - निंबाळकर प्रचाराच्या माध्यमातून मतदारसंघांमध्ये सक्रिय झाले आहेत. कै. हिंदुराव नाईक निंबाळकर , समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांच्यानंतर रणवीर नाईक - निंबाळकर सक्रिय राजकारणात आले आहेत. त्यामुळे हिंदुराव नाईक - निंबाळकरांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे.
कोण आहेत रणवीर नाईक - निंबाळकर?
माजी खासदार लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नातू, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र तर माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ते पुतणे आहेत. रणवीर नाईक - निंबाळकर हे सध्या बारामती (पुणे ) येथे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहेत. रणवीर नाईक - निंबाळकर राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कै. हिंदुराव नाईक - निंबाळकरांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय वारसदार म्हणूनही रणवीर समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.