Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ

गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेचा खरा आधारस्तंभ म्हणून ओळख असलेले माजी खासदार कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकाळात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. सर्वसामान्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत भाकरी-भाजी खाणारा, त्यांच्या दुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आजही फलटणकर त्यांना “आपला माणूस” म्हणून आठवतात.


त्याच विचारांचा वारसा पुढे नेत, त्यांचे चिरंजीव आणि फलटण नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे आज खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी म्हणून उदयास आले आहेत. वडिलांकडून मिळालेली समाजसेवेची प्रेरणा त्यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येते. “मला समाजाची सेवा करायची आहे” हा ध्यास त्यांनी मनाशी बाळगला असून, त्याच ध्येयाने ते कार्यरत आहेत.


नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या बैठकीत त्यांनी शहरातील विविध सभागृह व ठिकाणांना महापुरुषांची नावे देऊन त्यांना अभिवादन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे फलटण शहरात सर्वत्र स्वागत झाले असून, पहिल्याच बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे नागरिकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत.


समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची कार्यशैली ही साधी, सरळ आणि लोकाभिमुख आहे. मोठ्या राजकीय घराण्यातील असतानाही सर्वसामान्यांसारखे जीवन जगण्याचा त्यांचा स्वभाव, त्यांना जनतेच्या अधिक जवळ घेऊन जातो. “माझं ते चांगलं, त्यापेक्षा चांगलं ते माझं” ही त्यांची विचारसरणी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असला, तरीही साधेपणाने आणि कोणताही डामडौल न करता हा दिवस साजरा करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या संवेदनशीलतेचे द्योतक आहे. समाजातील दुःखद घटनांचा विचार करून त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतलेला निर्णयही त्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतीक आहे.


चार दशकांची राजकीय व सामाजिक परंपरा लाभलेल्या नाईक निंबाळकर कुटुंबातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांसारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समशेरसिंह नाईक निंबाळकर हे फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हा त्यांचा निर्धार आहे.


फलटणच्या जनतेसाठी काम करणाऱ्या या तरुण, अभ्यासू आणि संवेदनशील नेत्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून असेच लोकहिताचे कार्य घडत राहो आणि त्यांना शतायुष्य लाभो, हीच फलटणकरांची सदिच्छा.


फलटणच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या प्रवासात ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे युक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे संस्कार आणि विचारांची शिदोरी लाभलेले समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बालपणापासूनच समाजकारणाची दिशा स्वीकारली. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे ते ज्येष्ठ बंधू असून, त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे नेली आहे.


फलटण नगर परिषदेमध्ये तब्बल पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून कार्य करताना त्यांनी विकासकामांना गती दिली. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवत जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेतील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख झाले.


लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशयोजना अशा मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे फलटण शहर प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे.


समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि जनतेप्रती असलेली अपार बांधिलकी. प्रत्येक सामान्य माणसाशी जुळणारा त्यांचा स्वभाव आणि समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या कार्याला अधिकाधिक यश लाभो, हीच सर्वांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा! 


सचिन मोरे , संपादक - धैर्य टाईम्स, 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER