Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या विषमुक्त फळबागेतून उद्धव बाबर मिळवत आहेत लाखोंचे उत्पन्न

टीम : धैर्य टाईम्स

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलावली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा फळ निर्यातीतस आवश्यक असलले सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या दोन वर्षात श्री. बाबार यांनी आंबा परेदशात निर्यात केला आहे. यातून त्यांना भरगोस उत्पन्न मिळाले. याची दखल सातारा जिल्हा परिषदेने घेऊन कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांची ही यशकथा….
शेतकरी विविध पिकांसाठी शेतात रासायनिक खतांचा वारेमाफ वापर करीत असून रासायनिक खतांच्या व किटकनाशकामुळे जमिनीचा पोत खराब होतो व खर्चही अधिक आहे या उलट जर शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा वापर केल्यास जमिनीचा पोत चांगला राहून शेती उत्पादनात सातत्य टिकून राहाते, याबरोबरच सेंद्रीय खताच्या वापरामुळे उत्पादित होणाऱ्या शेतमालाचा दर्जा वाढून परदेशात निर्यात करण्यासाठी निकषाची समस्या निर्माण होऊ शकत नाही याचा फायदा शेतीमालास जादा भाव मिळण्यास होते, असे श्री. बाबर आर्वजुन सांगतात.
उत्पादित शेती मालाला चांगला भाव मिळावा यासाठी श्री. बाबर यांनी प्रारंभी पासूनच सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. श्री. बाबार यांनी दीड एकरात दिडशे केशर, हापूस, गुलाल्या व रायवळ जातीच्या कलमी रोपांची लावगड केली. यामध्ये केशर आंब्याची 120 झाडे आहेत. ही झाडे 12 फुटाहून अधिक उंच वाढली आहेत. माण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पाणी टंचाई या समस्येवर मात करुन सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देवून आंब्याची बाग फुलवली आहे.
सेंद्रीय शेतीसाठी त्यांना कृषि विभागाकडून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन संच, गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.
आंबा रोपाची लागवड केल्यापासून आज अखेर त्यांनी या फळबागेत रासायनिक खते व किटकनाशकाचा पूर्णत: वापर टाळून नैसिर्गत पद्धतीने बागेची जोपासना गेली दोन वर्ष करीत आहेत. गत वर्षातील फळ हंगामात निर्यातक्षम सर्व निकषाच्या चाचणीत केशर आंबा पात्र ठरल्याने दिडशे रुपये किलो दराने बोगतच व्यापाऱ्यांनी खरेदी केली. यंदाच्या हंगामात गत वर्षातील फळांपेक्षा अधिक क्षमतेने दर्जा वाढलेला निदर्शनास आल्याने यंदाही परदेशात विक्रीसाठी निर्यात करण्यास व्यापाऱ्यांनी बागेतच आंबा खरेदी करण्यास पसंती दिली.
नैसर्गित पद्धतीने आंबा बाग जोपण्याबाबत श्री. बाबार सांगतात आंबा हे फळ झाड जंगली आहे. पूर्णत: नैसर्गिक पद्धतीनेच जर आंब्याची झाडे जोपासली फळधारणा त्यानंतर फळाचा आकार व वजन आणि विशेष बाब म्हणजे नैसर्गिक पद्धतीनेच पाड लागल्यानंतर तो पाला पाचोळ्यात आच्छादनात पिकविल्यानंतर फळाचा नैसर्गिक रंग व गोडवा व चवही वेगळीच अनुभवास आले आहे.
नैसर्गिक पद्धीने पिकवलेला आंबा लवकर नासत सडत नाही. रासायनिक कार्बाईडचा वापर करुन जदल गतीने पिकविलेल्या आंब्याचा रंग एकसारखा गडद व आकर्षक असा जरी दिसत असला तरी तो आरोग्यासास हानीकार असा आहे हा आंबा लवकर सडतो हा  त्यातील फरक आहे. मी व माझी पत्नी बागेची वर्षभर निगा व देखरेख करीत असतो. बागेतील प्रत्येक झाडांना वाळलेले गवत, झाडांचा पाला पाचोळा, कुजलेले शेण तलावातील गाळाची माती एकत्रित मिश्रण करुन प्रत्येक रोपाच्या बुंध्याभोवती गोलआकार पसरुन ठिबक सिंचनाचा वापर करुन पाणी देत आहोत.
बाग लागवडीपासूनच रासायनिक खताचा वापर श्री. बाबार यांनी  टाळला आहे. तसेच झाडावर किटक नाशकाचा वापर केला नाही. झाडाच्या बुंध्या भोवती विविध कडधान्याबरोबरच देशी गायीचे गोमुत्राची स्लरी जिवामृत वर्षातून तीन वेळा दिले. झाडांना मोहर फुलोरा आल्यानंतर परागीभवनासाठी मध माशी व फुल पाखरु यांची भूमिका खूप महत्वाची मानली जाते. रासायनिक खताबरोबर विषारी किटकनाशकाच्या वापराचा अतिरेक वाढल्यामुळे पर्यावरण संतुलनात बदल झाला परिणामी आज शेतमळ्यात शोधूनही फुलपाखरे दिसून येत नाहीत. तरीही उपलब्ध मधमाशीची गरज पाहता बागेलगत   पडीक जमिनीत गोदन, कवट, काजू, तुती, आवळा, चिकू, बोर, पेरु, आवळा, हादगा, नारळ, गोड व आंबट चिंच, सरस, ॲवाकोडा, सिताफळ, रामफळ, देशी केळी, जांभळ व डांबून, फॅशन फ्रुट, इत्यादी प्रकारची देशी विदेशी फळ-फुलांचीही लागवड केली यामुळे बागेत मधमाशांचा वावर वाढू लागला याचा फायदा आंबा बागेस होत आहे.
श्री. बाबार हे ऊसाचेही पीक सेंद्रीय पद्धतीने घेत आहेत. ऊसाचे गुऱ्हाळात गाळण करुन रासायनिक औषधे घटकांचा वापर टाळून पूर्णत: सेंद्रीय गुळ व काकवी उत्पादन करीत आहे. सेंद्रीय गुळाची व काकवीची बाजारपेठेत   मागणी जादा असल्याने अधिकच्या किंमतीमध्ये ही ग्राहक खरेदी करीत आहेत. मागणी जादा व पुरवठा कमी अशी स्थिती प्रत्येक वर्षी अनुभवास मिळत असून भविष्यकाळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असेही आवाहन ते करताता.
विषमुक्त अन्न म्हणून सेंद्रीय उत्पादीत केलेल्या मालाकडे पाहिजे जाते. सेंद्रीय मालाला मुंबई, पुणे तसेच जिल्ह्यात मोठी मागणी आहे. मागणी प्रमाणे सेंद्रीय शेती उत्पादन  पुरवठा खूप कमी आहे. तसेच सेंद्रीय उत्पादीत केलेल्या मालाला चांगला दर ही बाजार पेठेत  मिळत आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढविले आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय शेतीकडे वळून विषमुक्त शेती करावी याला सर्वोतपरी सहकार्य कृषि विभाग करेल.


 - हेमंतकुमार चव्हाण, माहिती अधिकारी, सातारा

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER