Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

माजी आमदार कै. चिमणराव कदम यांचा गट काळाच्या ओघात नामशेष : निष्ठावंत कार्यकर्त्यांचे दुःख

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : फलटणचे माजी आमदार कैलासवासी सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या व्यथा वेदना जाणून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणारा तत्त्वनिष्ठ, परखड विचाराचा नेता म्हणूनही ते ओळखले जात होते.अनेकदा त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या त्या सत्राचा सर्वात उत्कृष्ट नेता म्हणूनही गौरवले होते. फलटणच्या गजानन चौकात चिमणरावांची सभा म्हटलं की सर्व रस्ते गर्दीने तुडुंब भरायचे. खरे तर चिमणराव शब्दांचे जादुगार होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्यानंतर असा परखड विचाराचा नेता फलटणला नव्हे तर सातारा जिल्ह्याला लाभला नाही हेही तितकेच खरे. 

फलटण विधानसभा मतदार संघातून १९८०,१९८५ व १९९० साली ते विजयी झाले. तर १९९५ साली त्यांना तब्ब्ल ४२३६७ मते मिळाली होती मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला. तब्बल २५ वर्षाहून अधिक काळ चिमणराव कदम फलटणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. गांधी घराण्याशी जवळचे संबंध जपत राजकीय वाटचाल चिमणराव कदम यांनी सुरू ठेवली होती. एकेकाळी काँगेसची मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्या चिमणराव कदम यांची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा होत होती.

मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून इतर पक्षात दिसू लागले. एकूण त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा सांभाळणारा सक्षम वारस मिळावा नसल्याने त्यांचा राजकीय गट आज जवळपास नामशेष झाल्याचे त्यांचे निकटचे कार्यकर्ते सांगतात. 

जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चिमणराव कदम यांनी फलटणच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री गरिबांच्या झोपडीत पर्यंत नेहली. तर गरीब बहुजन वर्गातील अनेकांना चिमणराव यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर नेहमीच मतांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. उमेदीच्या काळात त्यांचा असणारा दरारा आज पाहायला मिळत नाही. 

चिमणराव कदम यांचे चिरंजीव व जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला खरा परंतु ते नेमके कोणत्या पक्षात आहेत हेच मुळी मोठे कोडे आहे. चिमणराव कदम यांच्या सारखा धाक आणि दरारा त्याचबरोबर राजकीय प्रगल्भता नसल्याने साहेबांचा मतदार मात्र आज काळाची पावले ओळखून आपल्या सोयीनुसार इतरत्र दिसू लागला आहे. 

एकेकाळी तालुक्यात मोठा दरारा व मोठा मतदार वर्ग असणारा कदम गट सध्या आस्तित्वाची लढाई लढत आहे. चिमणराव कदम यांच्या मागे हजारोंचा गठ्ठा मतदान असणारा गट सध्या अंतर्गत नाराजीमुळे त्रस्त आहे. जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कर्मचारी वर्ग यांच्या जोरावर चिमणराव कदम यांनी राजकीय वाटचाल चालू ठेवली होती पण तीच वाटचाल आता सह्याद्री कदम यांना जपता येत नाही हे स्पष्ट झाले आहे. 

कै.चिमणराव कदम यांनी अनेक तरुणांना रोजगार व नोकऱ्या देऊन एक मोठा गट उभा केला होता तो गट सह्याद्री कदम पिढ्यान् पिढ्या न जपता नाराज केला आहे. लोकसभा निवडणूका, विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सर्व निवडणुका अशा अनेक निवडणुका मध्ये सतत भूमिका बदलत कधी या गटात तर कधी त्या गटात अशी विविध पक्ष बदलणारी भूमिका घेतल्याने फलटण तालुक्यांतील चिमणराव कदम यांच्या विचाराला मानणारा वर्ग गटापासून दूर चालला आहे. जो माणूस काळाची पावले ओळखत नाही तो माणूस काळाच्या आड होतो ही कल्पना सह्याद्री कदम यांना होताना दिसत नाही.

कर्मचारी वर्ग व कदम गट यांना मानणारा वर्ग यांना मनापासून जपणे हे कदम गटाच्या पुढील पिढीला न जमल्याने स्वतःला कदम गटाचे किंगमेकर समजणे हास्यास्पद आहे. नको त्या व्यक्तींचे नको ते ऐकणे यामागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. ज्या सल्लागारांनी तालुक्यांतील अनेक राजकीय घराण्याची राजकीय वाटचाल नको तो सल्ला देऊन संपवल्याने सह्याद्री कदम यांनी वेळीच सावध होऊन ओळखायला हवे आहे असे साहेबांवर प्रेम करण्याऱ्या निष्ठावंत नेत्याने सांगितले. एकंदरीतच सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती पाहता फलटण तालुक्यात जनतेच्या मनातील अपेक्षित तिसरा पर्याय नसल्याचे दिसत असल्याची खंत अनेक जण व्यक्त करतात.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER