Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

अर्ध्या टी.एम.सी.चा भगीरथ : खा रणजितसिंह यांचा पुन्हा टोला

आपला गट लवकरच भाजपा मध्ये : प्रल्हादराव साळुंखे पाटील
टीम : धैर्य टाईम्स

कृष्णा - खोरे उपाध्यक्ष म्हणजे अर्ध्या टी. एम. ची. चा भगीरथ अशी उपहासत्मक टिका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार रामराजे यांची केली. ते हिंगणगाव येथे फलटण तालुका संपर्क दौऱ्यात बोलत होते.

यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण शुगर वर्क्स चे माजी चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव साळुंखे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अमित रणवरे, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत, सौ. इंगोले, हिंगणगाव, आळजापूर, कापशी, टाकूबाईचीवाडी, शेरेचीवाडी, सालपे,सासवड आदी भागातील आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, रामराजे 15 वर्ष मंत्री असताना निरा -देवघर प्रकल्पाच्या फाईल वर सही केली नाही. फलटण तालुक्यातील जनतेचा 25 वर्षाचा पाण्याचा हक्क  हिरावला असून तालुक्यातील जनता अशा गद्दारांना आता योग्य उत्तर देईल असे खा. रणजितसिंह म्हणाले.

आता धोम - बलकवडीच्या माध्यमातून जनतेला पाणी देण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले असून आपण केवळ तुमचा सेवक आहे असे यावेळी खासदार निंबाळकर यांनी नम्रपणे सांगितले. तर निरा -  देवघर च्या अतिरिक्त पाण्यामधून आता आठ महिने सिंचणासाठी पाणी मिळणार असून लवकरच तेच पाणी 12 महिने शेतकऱ्यांना मिळेल अशी ग्वाही यावेळी खासदार रणजितसिह यांनी दिली.

फलटण तालुक्यातील जनतेला 25 वर्ष पाण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या गद्दारांना  जनताच जागा दाखवून तालुक्यातमध्ये परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास यावेळी खा. रणजितसिंह यांनी व्यक्त केला.

लोणंद - फलटण रेल्वे चालत नाही असे म्हणणारे गद्दारांनी रेल्वे रुळावर झोपून दाखवावे असा टोला यावेळी खा. रणजितसिंह यांनी लागवला.

आपण फक्त धोम -बलकवडीच पाणीच आणले नाही तर वडिलांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न लोणंद - फलटण  रेल्वे प्रत्यक्षात आणून ते पूर्ण केले आहे तर लवकरच पंढरपूर रेल्वे मार्गाची निविदा निघणार असून बारामती रेल्वे मार्गाचे कामही लवकरच सुरु करू अशी ग्वाही यावेळी खा.रणजितसिंह यांनी दिली.

ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी यावेळी बोलताना  सांगितले की, हा संपर्क दौरा नसून हा सत्तेच्या परिवर्तन मेळावा आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सत्तेला सुरुंग लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कामाचा धडाका लावला आहे. धोम - बलकवडीच्या कामाचा  धसका रामराजेंनी घेतला आहे असे यावेळी प्रल्हादराव पाटील यांनी सांगितले. केवळ निवडणूक काळात पाणी सोडून पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका जिंकल्याचा टोला रामराजे यांचे नावं न घेता पाटील यांनी लागवला.

माजी आमदार कै. चिमणराव कदम यांच्या कामाचा उल्लेख यावेळी पाटील यांनी केला. विरोधकांच्या वलग्नाना आता जनता भुलणार नसून खासदारांचा मेरू कोणी रोखू शकत नाही असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

खा. रणजितसिंह हे ज्या ठिकाणी चुकतील त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.असे यावेळी साळुंखे पाटील म्हणाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आपला गट भाजपा मध्ये विलीन करण्याची घोषणा यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केली.

माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यावेळी बोलताना म्हणाले की, मोठे प्रकल्प या भागात आणले पाहिजेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार मोठे काम करत आहेत. सामाजिक विचार सामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे, तालुक्यातील केवळ डीपी बसवून चालणार नसून येणारी वीज वाढवली पाहिले हे यावेळी भोसले यांनी निदर्शनास आणून दिले. लवकरात लवकर आपले काम खासदारांच्या माध्यमातून पूर्ण होईल, वेगवेगळ्या विषयावर खासदार कार्यरत असून राजकारणा पेक्षा समाजकारवर आपण भर देणार असल्याले यावेळी भोसले यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER