फलटण - सचिन मोरे
फलटण तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी आणलेल्या अनेक तीनचाकी सायकल पंचायत समिती इमारतीच्या पार्किंग मध्ये धूळ खात पडल्या आहेत. हजारो रुपये खर्च करून दिव्यांग बांधवांच्या सोयीकरिता तीन चाकी सायकल मोफत देण्याची योजना पंचायत समिती मार्फत राबवली जाते. मात्र उदासीन अधिकाऱ्यांमुळे हजारो रुपयांच्या सायकल अशाप्रकारे धुळखात पडल्या आहेत.
या तीनचाकी सायकल नक्की कोणाला द्यायच्या आहेत हा प्रश्न आता समोर येत आहे. हजारो रुपये खर्च करून दिव्यांग बांधवांसाठी आणलेल्या सायकल वितरित न केल्याने अक्षरशः धूळ खात पडून आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची नोंद घेऊन कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.