अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचवड, ता. वाई येथील विराट नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या तिघांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचवड, ता. वाई येथील विराट नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या तिघांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ ऑक्टोंबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास पाचवड येथील विराटनगर परिसरात असणाऱ्या दुर्गा माता नवरात्र मंडळा समोर महाप्रसादाचे जेवण सुरू असताना तेथीलच रुपेश राजेंद्र मोरे, आकाश आनंदा शिंदे, शुभम दुर्योधन चव्हाण यांनी एका अल्पवयीन मुलीकडे पाहून, वाईट हेतूने हातवारे करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.