ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना झी टॉकीज वाहिनी तर्फे विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी विठ्ठल रुक्मिणीची आरती ॲड.सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
झी टॉकीज या मराठी वाहिनीच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पर्यंत झी टॉकीज ची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमांतर्गत चित्रीकरणर केले जात आहे. या चित्रीकरणाच्या दरम्यान आज फलटण येथील मुक्काम प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना झी टॉकीज वाहिनी तर्फे विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी विठ्ठल रुक्मिणीची आरती ॲड.सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी झी टॉकीज चे प्रतिनिधी बिभीषन मुंगूसकर, स्वाती मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲड.सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती ची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमा वेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्यातर्फे वारकऱ्यांची सेवा, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक उपक्रमांवर पथनाट्य सादर करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून अशा विविध सामाजिक उपक्रमांवर पथनाट्याद्वारे महाराष्ट्रभर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी ॲड.सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी पथनाट्य सादर करणाऱ्या सर्व कलाकारांना आपण विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत असल्याबद्दल शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.