अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.
कराड : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.
यामध्ये तालुक्यात दक्षिण भागातील विशेषत: रेठरे बुद्रूक, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक या पाच गावांमध्ये सुमारे आठवडाभरापासून चिकुन गुनिया सदृश्य शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सध्या तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, चिकुन गुनिया सदृश्य आजाराच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणाचे रुग्ण आढळून येत असलेल्या तालुक्यातील गावागावात रुग्ण सर्व्हे, रक्त नमुन्यांचे संकलन, गरजूंना औषधांचे वाटप व डासांच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्याची मोहिम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.
गत आठवड्यात कराड तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली होती. या पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचली असून ओढे, नालेही तुडूंब भरून वाहत होते. पाऊस ओसरल्यानंतर मात्र डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना सर्दी, खोकला, तीव्र ताप आणि सांधे आखण्याच्या वेदना आदी. चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. परंतु, त्यासंबंधित तपासणी केल्यास त्याचा अहवाल नील येत आहे. मात्र, रुग्णांना चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. ही सर्व लक्षणे चिकुन गुनिया सदृश्य असल्याचे डॉक्टरांकडूनही सांगण्यात येत आहे.
तालुक्यातील रेठरे बुद्रूक, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक या गावात गत दहा ते बारा दिवसांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाचे शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावातील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे चिकुन गुनिया सदृश्य साथीला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणाही सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाकडून रेठरे बुद्रूक, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक या गावांशी संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या वतीने आशा सेविका, सुपरवायझर यांच्यामार्फत रुग्ण सर्व्हे करण्यात येत आहे.
सर्व्हेमध्ये काही संशयीत रुग्णांचे रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी सातारा येथील पब्लिक हेल्थ लॅबकडे पाठविले जात आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या वतीने गरजू रुग्णांना ताप, सर्दी खोकल्यांच्या औषधांचे वाटप केले जात आहे. त्याचबरोबर गावातील सांडपाणी साठणाऱ्या ठिकाणी डासांच्या अळ्या निर्मुलनासाठी ॲबटींग केले जात आहे. नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायतींनी फॉगिंग मशीनच्या सहाय्याने गावात धुरीकरण करावे, तसेच गटारे वाहती करावीत, फ्रीजच्या ट्रेमध्ये डासांच्या अळ्या आहेत का? याची तपासणी करावी, टायर, नारळाच्या करवंटया यांमध्ये पावसाचे पाणी चासू देऊ नये, आदींची काळजी घेण्याचे आवाहनही तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
औषधांचा साठा मर्यादित
चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाचा तालुक्यातील काही गावात फैलाव झाला आहे. परंतु, आरोग्य विभागाकडे त्यासाठी आवश्यक औषधांचा साठा मर्यादीत असून या औषधांचा गरजू रुग्णांसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनीही गावात या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत आरोग्य विभागाकडून लेखी कळवण्यात आले आहे. हेल्थ वेलनेस सेंटर (पीएसी) व उपकेंद्रांमधील ओपीडीमध्ये रुग्णांवर दैनंदिन औषधोपचार केले जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल कोरबू यांनी दिली.
सध्या, तालुक्यातील काही गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाचा फैलाव झाला आहे. परंतु, तपासणीत सदरचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत नाहीत. सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी आदी. लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून संबंधित गावांत रुग्ण सर्व्हे, डास अळ्यांचे निर्मूलन व त्यासाठी ॲबिटींगचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नागरिकांना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन केले जात आहे.
- डॉ. सुनिल कोरबू, तालुका आरोग्य अधिकारी, कराड.