फलटण प्रतिनिधी :
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी - बेडके यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथून दि. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी वाजता राहत्याघरापासून निघेल अशी माहिती त्यांच्या निकटवर्ती यांच्याकडून देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, सचिन बेडके - सूर्यवंशी व महेंद्र बेडके - सूर्यवंशी तर सून व नातवंडे असा परिवार आहे. सुभाष काकांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.