फलटण प्रतिनिधी -
लक्ष्मणराव उर्फ तात्या नानासाहेब दडस यांची खटकेवस्ती ता. फलटणच्या उपसरपंचपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील संवेदशील व राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या खटकेवस्ती ग्रामपंचायत उपसरपंचपदी लक्ष्मणराव उर्फ तात्या नानासाहेब दडस यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक राव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रात विविध मान्यवरांनी धाडस यांच्या अभिनंदन केले आहे.