फलटण - भाजपाची मदत घेऊन रामराजेनां आपण विधानपरिषदेचे सभापती केले तर
पालकमंत्री व इतर महत्वाची पदे दिली असे असतानाच पुन्हा विधापरिषदेवर संधी दिली असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती बरोबर नराहता घरात दार लावून पक्षाच्या विरोधात काम करतात. तुमच्यात धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि खुले काम करा असे आव्हानउपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना केले. ते आज साखरवाडी ( ता. फलटण ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,खा. नितीनकाका पाटील, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे - पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) महायुतीचे उमेदवार सचिन पाटील, डी. के. तथा ज्ञानेश्वर पवार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, ॲड. जिजामाता नाईक निंबाळकर, विक्रम भोसले,उद्योजक राम निंबाळकर, जयकुमार शिंदे, नानासाहेब उर्फ पिंटू इवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले, विकण्या बाबतीत फलटणचे श्रीमंत पुढे आहेत त्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जमीन विकली, सहकारी दुध संघाची जमीन विकत सहकारी संस्थांचे वाटोळे केले आहे. तर श्रीराम कारखाना आव्हाडे यांना चालवायला दिला आहे. मालोजीराजे यांचे नाव असणारी बँक सुद्धा चालवायला दिली असून आता आमदारकी सचिन पाटलांना चालवायला देणार असल्याचा टोला रामराजे यांना लगावला.
येणाऱ्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना शेती पंपाना दिवसा विज पुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे सांगून सरकारने महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात बंदी उठवन्याचे काम केले असून शेती विज बिल माफ केलेचे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलर पॅनेलसाठी विविध योजना आणल्या आहेत. तर लाडक्या बहिणीची योजना सुरुच राहणार असल्याचे ना. पवार यांनी सांगतानाच विरोधात मात्र ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले होते हे सांगितले. 3 गॅस सिलीडर मोफत दिले असून मुलींची शालेय फी महायुती सरकारने माफ केली असल्याचे ना. अजित पवार यांनी सांगितले.
संजीवराजे यांना मी विधानपरिषदेला उभा करत होतो, मात्र रामराजेंनी नकार दिला आणि शेखर गोरेंना उभं केलं. रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधक त्यांच्याबाबत फेक नरेटिव्ह सेट करत आहेत. इतके दिवस श्रीमंतांचं ऐकलं, आता अजित पवाराचं ऐका. फलटणमधून सचिन पाटलांना विजयी करा, असं आवाहन शेवटी अजित पवारांनी केलं आहे.
सातारा जिल्हा बँकेची भरती असून 300 जागा आहेत. ती ऑनलाईन पद्धतीने भरती आहे. मात्र काही जण तुम्ही मला राजकारणात मदत करा मी तुम्हांला चिटकवतो असा चुकीचा प्रचार करत असल्याचे ना. अजित पवार यांनी रामराजे यांचे नाव नघेता सांगतानाच या भरती प्रक्रियेला कोणी फसू नका असे आवाहन ना. पवार यांनी केले.