मुंबई -
विधान परिषदेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळविला. रामराजे यांच्या विजयानंतर फलटण शहरासह तालुक्यांमध्ये फटाक्यांची अतिशबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच श्रीमंत रामराजे है राष्ट्रवादीचे एकनिष्ठ म्हणून सुपरिचित आहेत. 2009 मध्ये मतदार पुनर्रचनेत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे पक्षाने यांची विधान परिषदेवर 2010मध्ये संधी दिली होती. 2022 मध्ये पुन्हा एकदा रामराजे नाईक-निंबाळकर यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेवर संधी दिली आहे.