डिजिटल बँके मुळे जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार अति जलद होण्यास मदत मिळणार आहे. या मुळे व्यापारी वर्गाला व इतरांना सुरक्षित व २४ तास व्यवहार करण्यास मिळणार आहे.
भारताच्या अमृत ७५ महोत्सव निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ७५ जिल्हा मध्ये डिजिटल बँकेची सुरुवात करण्यात येणार आहे त्याचा एक भाग म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड याचे कडे सातारा व सोलापूर जिल्हा मध्ये डिजिटल बँकेची शाखा सुरु करावी अशी मागणी केली होती. आज दि. २३ जून रोजी डॉ.कराड यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मंजुरीचे पत्र दिले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आर्थिक बळकटीला खुप चालना मिळणार आहे. लोकांना घर बसल्या ठेवी कर्जे चे व्यवहार करता येणार आहेत, कसल्या ही पद्धती चे कागदपत्रे हाताळावी लागणार नाहीत. डिजिटल बँक चोवीस तास सुरु असणार आहे. तसेच कधी ही पैसे काढणे,भरणे सोपे होणार आहे. कर्ज प्रकरणे आँनलाईन पद्धतीने मागणी करता येणार आहेत. देशांमध्ये अशा पंचाहत्तर बँक मंजुर झाल्या आहेत त्यापैकी सातारा जिल्हासाठी खा. निंबाळकर यांच्या प्रयत्नाने हि मंजुरी मिळाली आहे. ही बँक नवीन रोबाटिक व आधुनिक तंत्रज्ञानाने चालणार आहे त्यामुळे औद्योगिक, व्यापाराच्या दुष्टीने खुप मोठी उलाढाल होणार आहे. त्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर व्यापारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.