फलटण प्रतिनिधी -
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी मानेवाडी ता. फलटण येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांमध्ये पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्यासंबंधी जागृती होण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. या उपक्रमांतर्गत कृषिदूतांनी बियाणे निवड, उगवण चाचणी, रासायनिक व जैविक बीजप्रक्रियेचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषिदूत शिवराज घोडके, साहिल भिलारे, अपूर्व बांगर, यशराज खटके,ओमप्रकाश साळुंखे,शुभम गुरव,निखिल सोडल यांनी केले होते. या प्रात्यक्षिकासाठी मानेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी कृषी महाविद्यालयाच्या विषय विशेषज्ञ प्रा.ए. एच.करपे व कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. पी. गायकवाड, प्रा.एस.व्ही. बुरुंगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.