फलटण प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विक्रीकर निरिक्षक (S.T.I.) परीक्षेत उज्वल यश प्राप्त केल्यामुळे फलटण येथील अनिकेत दिपक काकडे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मा. नगरसेवक सनी अहिवळे मित्र मंडळ व सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
अनिकेत दिपक काकडे यांचे उज्वल यश हे मंगळवार पेठे करीता अभिमानास्पद आहे ज्यामुळे मंगळवार पेठेच्या लौकीकात भर पडली आहे. मंगळवार पेठेतील मुलांना शिक्षणाची स्फुर्ती मिळावी म्हणुन अशा उच्चशिक्षीत गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सनी अहिवळे मित्र मंडळ व सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट फलटण यांच्या माध्यमातुन सातत्याने घेण्यात येत असतो.
अनिकेत काकडे यांचा सत्कार मा.नगरसेवक सनीदादा अहिवळे यांच्या बुध्दा या निवासस्थानी आज रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.